मुंबई शासकीय दंत महाविद्यालयाचे अभिनव संशोधन ; घरबसल्या मोबाईल अॅपद्वारे घेता येईल लहान मुलांच्या दातांची काळजी

आरोग्य मुंबई

मुंबई / प्रमोद अडसुळे 
मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान मुलांच्या दातांच्या समस्या सोडवण्यासाठी Pedodontics हे अॅप तयार केले आहे. 0 ते 12 वयोगटातील मुलांच्या दातांची वाढ, समस्या आणि उपचारांबाबत यात माहिती मिळेल. मौखिक आरोग्यासह मुलांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी महत्वाच्या बाबींचीही माहिती या अॅप मार्फत मिळण्यास मदत होणार आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरवर ते उपलब्ध आहे. महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग असून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तयार केले आहे हे विशेष. अॅपब्रेनच्या अहवालानुसार स्वित्झर्लंड या देशात पेडोडोन्टिक्स हे मोबाईल अॅप वैद्यकीय विभागात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

प्रत्येक पालक हा आपल्या बाळांच्या दातांची निगा आणि त्यांची योग्य काळजी कशाप्रकारे घ्यावी यासाठी प्रयत्नशील असतो. मात्र, यासाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने पालक हताश होतात. यासर्व बाबींचा विचार करून मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी मिळून ‘पेडोडोन्टिक्स (Pedodontics)’ नावाचे एक मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये ० ते १२ वयोगटातील मुलांच्या दातांची वाढ, समस्या आणि उपचारांबाबत कशाप्रकारे काळजी घेता येईल याची सविस्तर माहिती पालकांना घरबसल्या मिळणार आहे. मौखिक आरोग्यासह मुलांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी बाबींचीही माहिती या अॅपद्वारे घेता येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना शासकीय दंत महाविद्यालयातील बाल दंतचिकित्सक तज्ज्ञ तथा विभाग प्रमुख डॉ. डिंपल पाडावे म्हणाल्या कि, लहान मुलांमध्ये दात किडल्याची समस्या सर्वाधिक असते. दात किडल्याने ते काढून टाकल्याने शरीरावर होणाऱ्या परिणामांची अनेकांना जाणीव नसते. त्यामुळे लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी ? याचं ज्ञान पालकांना नसल्याने अशा परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागते. या बाबींचा विचार करून आम्ही हे अॅप तयार केले आहे. यात फक्त दातांचीच नाही तर कोणत्या वयात बाळाची शारीरिक व मानसिक वाढ किती असावी ? किंवा किती डोस दिले पाहिजेत ? याची सविस्तर माहिती पालक आणि सर्व दातांच्या डॉक्टरांनाही याची विशेष मदत मिळणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या एका क्लिकवर सर्वांना ही माहिती मिळणार आहे.

 

 

हे अॅप तयार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई, जॉईंट डायरेक्टर (दंत विभाग) तथा शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विवेक पाखमोडे यांचे मोठे सहकार्य लाभले आहे असे डॉ. पाडावे म्हणाल्या. सर्व सहकारी डॉक्टर्स, कर्मचारी यांचीही मोठी मदत झाल्याचे डॉ. डिंपल पाडावे म्हणाल्या.

 

असे वापरता येईल हे अॅप

सध्या हे अॅप गुगलच्या प्ले स्टोअरवर अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, लवकरच आय फोनवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अॅप डाऊनलोड केल्या नंतर प्रथम लहान मुलाचे नाव, वय, वजन आणि लिंग या तीन बाबी नमूद कराव्या लागतील. त्यानंतर एका क्लिकवर आपल्या बाळाची शारीरिक व मानसिक वाढ योग्य पद्धतीने होते आहे का ? याची सविस्तर माहिती पालकांना मिळणार आहे. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे “बाळाच्या मौखिक आरोग्यासह त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी सर्वांगीण विकास योग्य पद्धतीने होतो आहे का? हे सुद्धा अॅपद्वारे पालकांना कळू शकणार आहे”, असेही डॉ. पाडावे यांनी सांगितले.

लवकरच मराठी आणि हिंदी भाषेतही – डॉ. डिंपल पाडावे

आज पालक मुलांच्या बाबतीत फार संवेदनशील असलेले पाहायला मिळतात. त्यांना उत्सुकता असते कि, आपल्या मुलाची वाढ समयपणे होत आहे का ? सध्या गुगल वर मोठ्या प्रमाणात माहितीचा मारा केला गेला आहे कि, चूक काय आणि बरोबर काय हे समजणे कठीन होऊन जाते. या सर्व बाबींचा विचार करून आणि गेल्या वीस वर्षापासून मी शासकीय दंत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करत असताना रोज शंभरावर पेशंट येतात त्यांच्या समस्या पाहून यावर आपण काहीतरी केले पाहिजे जेणेकरून पालकांना त्यांच्या मुलांची निरोगी वाढ करताना सोपे जाईल. यासाठी हे अॅप अतिशय उपयुक्त आहे. वैद्यकीय भाषेतील काही इंग्रजी शब्दांचे अर्थ बऱ्याच वेळा लवकर लक्षात येत नाहीत. विशेषतः ग्रामीण भागातील पालकांना भाषेची अडचण येऊ नये. यासाठी मातृभाषेत सविस्तर माहिती देण्यासाठी येत्या दोन महिन्यात मराठी आणि हिंदी भाषेत पेडोडोन्टिक्स अॅप उपलब्ध करणार आहोत.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *