आसराची पुजा करताना लागली आग; आजीसह मायलेकी होरपळल्या

ई पेपर बीड
Spread the love
  • बीडमधील दुर्दैवी घटना, जखमींवर रुग्णालयात उपचार 
श्रद्धेपोटी आजही ग्रामीण भागातील लोक आसराची पुजा अरचा करतात. बीडमध्येही एक कुटुंबीय शुक्रवारी (दि.29) सकाळी आसरा देवीची पुजा करत असताना पेटलेली काडी अचानक खाली पडल्याने तेथील वाळलेल्या गवाताने पेट घेतला. लागलेल्या आगीत आजीसह माय-लेकी गंभीररित्या भाजल्याची दुर्दैवी घटना  बीड शहरातील नाळवंडीनाका परिसरात घडली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये तीन वर्षाच्या लहान मुलीचा समावेश आहे.
बीडशहरापासून अवघ्या दहा किलो मिटर अंतरावर असलेल्या चिंचोली माळी येथील काळे कुटुंबीयांच्या वतीने शहरातील नाळवंडी नाका परिसरात असेलल्या  आसरांची पुजा करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या पुजेसाठी नातेवाईकांसह घरची मंडळी त्याठिकाणी जमा झाली होती. याठिकाणी बाजूला गवत होते आणि सध्या उन्हाचा पारा तीव्र असल्याने खाली पडलेल्या काडीमुळे गवताने पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात आग पसरली. त्यामुळे पुजेसाठी आलेल्या लोकांची धावाधाव झाली. मात्र या आगीत एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर गंभीररित्या भाजले गेले. आश्विनी शिंदे यांची आई बबीता शिंदे तर अवघ्या तीन वर्षाची आश्विनी शिंदे यांची मुलगी वैष्णवी काळे ही गंभीररित्या भाजली. दरम्यान उपचारासाठी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आश्विनी काळे ह्या 37 टक्के तर बबीता शिंदे 41 आणि वैष्णवी 29 टक्के भाजली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *