दानवेंचा “डीएनए पाकिस्तानचा” ; आमदार बच्चू कडूंची दानवेवर जोरदार टीका

राजकारण

मुंबई: पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले असे वादग्रस्त विधान केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात देशात प्रचंड रोष तयार झाला. दानवेंवर चौफेर टीका होताना दिसत आहे. आता आमदार बच्चू कडू यांनी दानवेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. रावसाहेब दानवेंवर टीका करतना आ.कडू म्हणाले की, दानवेचा डीएनए तपासून घ्या, हा पाकिस्तान चा असू शकतो, गांजा पिऊन भाषणे तर करतोच. भारतीय जवानांना अतिरेकी म्हणणारा साला दानवेला तुम्ही खासदार करणार का?’ असा सवाल यावेळी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. रावसाहेब दानवे यांची वादग्रस्त विधाने करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावरून मोठे वाद निर्माण झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हाती घेऊन विरोधकांना लक्ष्य करत आहे. पण, या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे.

काय म्हणाले होते दानवे
सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *