पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतंय!; ना.धनंजय मुंडे यांचा गंभीर आरोप

ई पेपर बीड राजकारण

बीड : एकाच दिवशी दोन राष्ट्रीय पक्षाला एकाच मार्गावरून परवानगी देता येत नाही. माञ येथील जिल्हा पोलिस प्रशासन भाजपच्या दबावाखाली काम करत असून त्यानी आमच्या सभेला परवानगी नाकारली. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे पोलीस प्रशासन दिसत असून त्यांचा जीववर मस्तीत वागत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी इथे पत्रपरिषदेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येणार आहे. त्या पार्शवभूमीवर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, आमदार अमरसिह पंडित, माजी आमदार सय्यद सलिम, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी, दादासाहेब मुंडे, संदीप क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
ना. धनंजय मुंडे म्हणाले की, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भव्य रॅली काढून भरण्यासाठी तसेच रॅलीच्या समारोपाची सभा घेण्या साठी पोलीस प्रशासनाकडे दि. १९ मार्च २०१९ रोजी परवानगी अर्ज करण्यात आला होता . मात्र भाजप च्या पद्धधिकार्यांनी दबाव तंत्राचा वापर करून आमच्या सभेला परवानगी नाकारली. ती नाकारण्याचे कारण विचारण्यात आल्यानंतर आम्हाला कळविण्यात आले की, त्याच दिवशी भाजप उमेदवार यांची ही रॅली असून ते ही सभा घेणार आहेत. मात्र आम्ही ज्या रस्त्यावरून रॅली काढणार आहोत त्याच मार्गावरून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराच्या रॅलीला परवानगी निवदुकीच्या काळात देता येत नाही. परंतू असे असताना पोलिस प्रशासन असा करत असेल तर याचा अर्थ पोलीस अधीक्षक हे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे दिसत असून हे प्रशासन भाजपच्या जीवावर मस्तीत वागत असल्याचा आरोप करत मुंडे म्हणाले की, याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे कररणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फॉर्म भरण्यासाठी आमच्या बहिणाबाई रेल्वेने येनार!
रेल्वेने येणार असल्याचे आमच्या बहिणाबाई म्हणत होत्या. आज मला वाटतय की त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेल्वेने येऊन भारतात की काय असा खोचक टोला पंकजाताई यांना मारत त्यांच्या स्वागतासाठी आपल्या सर्वांना जावे लागणार आहे अशा मिश्किल शब्दात त्यांची खिल्ली उडवली.

सभा रद्द
पोलीस प्रशासन ची अन्याकारक भूमिकीमुळे आम्हाला रॅलीची तसेच उन्ह जास्त पडत असल्या ने जनतेला त्याचा त्रास होईल त्यामुळे लोकांनाही त्याचा त्रास होऊ नये म्हणून सभा रद्द केल्याचे ना. मुंडे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *