बीड शहरात उपजिल्हाप्रमुख हनुमान पिंगळेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना सदस्य नोंदणी अभियान

देश-विदेश

भगवा फडकविणाराचं या ब्रिदवाक्यानुसार शिवसेनेने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन, मराठवाडा संपर्क प्रमुख तथा शिवसेना नेते खा.चंद्रकांत खैरे व जिल्हासंपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान जोरदारपणे सुरू आहे. काल बीड शहरातील हनुमान मंदिर परिसर तसेच इतर ठिकाणी उपजिल्हाप्रमुख हनुमान (बंडू) पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.
बीड जिल्ह्यात शिवसेनेने राजकीय दुष्काळ संपविण्यासाठी चांगलीच कंबर कसली असून जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या झंझावाती दौर्‍यानंतर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात सदस्य नोंदणी अभियान मोठ्या जोमाने सुरू आहे. काल शहर उपजिल्हाप्रमुख हनुमान (बंडू) पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या सदस्य नोंदणी अभियानात शहर वासियांनी भरपूर प्रतिसाद दिला असून महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोबतच शहरातील युवकांनीही या अभियानात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. या अभियानावेळी उपजिल्हाप्रमुख हनुमान (बंडू) पिंगळे, चंदू ठोंबरे, विशाल राऊत, गणेश पिंगळे, ऋषी मस्के, अभि पिंगळे, सुरज मस्के, गोंविद पिंगळे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *