छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय मुलीची विष पिऊन आत्महत्या

ई पेपर बीड

बीड येथे राहणाऱ्या एका नववीत शिकणाऱ्या विद्यर्थिनीने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याचा घटना घडली आहे. या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. स्वाती राठोड असे या १६ वर्षीय मुलीचे नाव असून. तिचे वडील गोविंद किसन राठोड यांनी स्वातीच्याच शाळेत शिकणाऱ्या अमर तिडके आणि हनुमंत सावंत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार गोविंद किसन राठोड (३६) हे व्यवसायाने ऊस तोड मजूर असून बीड येथील वडवणी तालुक्यातील उपळी येथील ब्रह्मनाथ तांडा येथे राहतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून पहिली मुलगी स्वाती,आणि दुसरी मुलगी ज्योती तर मुलगा माउली अशी अपत्ये आहेत. यापैकी मुलगी स्वाती (१६), जवळच्याच सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव तालुका धारूर येथे इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती तर ज्योती आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी शुगर साखर कारखाना कर्नाटक येथे काम करीत असताना गोविंद यांना सायंकाळी सहा वाजता तेलगाव येथील डॉक्टर विनोद शेटे यांच्या मोबाईलवरून त्यांची पत्नी जिजाबाई यांचा फोन आला. तिच्याकडून कळाले की, स्वातीवर विनोद शेटे यांच्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत. तिने तणनाशक पिऊन आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर तिथे उपचार करणे शक्य नसल्याने पुढील उपचारासाठी तिला माजलगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती.
ती शिकते त्या शाळेत शिकणारे अमर तिडके (रा. भोगलवाडी) आणि हनुमंत सावंत (रा .उपळी) हे तिचा नेहमी शाळेमध्ये पाठलाग करून छेड काढीत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून स्वातीने तणनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत स्वतः स्वातीने विष पिल्यानंतर तिच्या आईला सांगितले. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुन्हा तिला माजलगाव येथील रुग्णालयातून पुढील उपचारासाठी बीड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनांक २२ जानेवारी २०१९ रोजी उपचारादरम्यान स्वातीचा मृत्यू झाला.
तिच्या मृत्यूसाठी तिच्या शाळेत शिकणारे अमर तिडके आणि हनुमंत सावंत हे दोघे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्वातीचे वडील गोविंद राठोड यांनी केली आहे. पोलिसांनी याबाबतीची फिर्याद नोंदवली असून या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *