अंबाजोगाईत नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून

ई पेपर बीड

अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा आज रात्री ८ वाजताच्या सुमारास खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. परळी वेस येथे झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्यारांच्या साह्याने जोगदंड यांच्यावर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *