अख्या गावाला अन्नातून विषबाधा… माजलगाव तालुक्यात खळबळ!

ई पेपर बीड

तालुक्यातील उमरी (बु ) गावातील लोकांना भगरी विषबाधा झाली असुन जवळपास सगळ्याच गावाथ विषबाधा झाली आसुन विषबाधीत रुग्णांना माजलगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल केले आसुन जागे आभावी काही रुग्णांना आंबाजोगाई व बिड येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती आशी की आज एकादशीचा उपवास आसल्याने गावातील लोकांनी उपवसाचा फरळ म्हणून पँकींग भगरीच्या भाकरी व खिचडी सकाळी खालल्याने बिषबाधा झालेल्या रुग्णांना चक्कर येणे,मळमळ होणे हि लक्षणे दिसून येत आसल्यामुळे गावातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात व माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गर्दी केली होती. परंतु ग्रामीण रुग्णालयात डाँक्टर व नर्स यांनी परिस्थीचे गांभीर्य लक्षात घेऊन विषबाधीत रुग्णांना त्वरित उपचार करणे सुरू केले आहे.दरम्यान माजलगाव ग्रामीण रुग्णालयात एका बेडवर दोन – दोन रुग्णावर उपचार सुरू आसल्याने काही रुग्णांना स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालय आंबाजोगाई, शासकिय रुग्णालय बिड व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आसुन.सध्या तरी परीस्थिती नियंत्रणात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *