मतदान केलं पण कुणाला पडलं…! पत्रकारांनी घेतला व्हीव्हीपॅट मशिनसह मतदानाचा अनुभव…

ई पेपर बीड
गौतम बचुटे / केज

एकाला मतदान केलं तरी ते अन्य उमेदवाराला पडत असल्याच्या चर्चेला ब्रेक देण्यासाठी आपण ज्याला मतदान केलं; त्याची खात्री करण्यासाठी आता या पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्याचे प्रात्यक्षिक पत्रकारांना दाखविण्यात आले.
केलेले मतदान त्याच उमेदवाराला नोंदविले गेले की दुसऱ्याच्या नावे गेले? मतदान यंत्रात काही बिघाड तर नाहीना? मतदान हॅक करता येते का ?मतदान यंत्र रिमोट कंट्रोलद्वारे बदलले तर जाणार नाही ना! असे अनेक प्रश्न मतदाराच्या मनात निर्माण होतात. त्याचे निरसन करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया पारदर्शी व निःपक्ष होण्यासाठी आता निवडणूक आयोग निवडणुकात व्हीव्हीपॅट मशीन वापर करण्यात येणार असून केज तहसील कार्यालयाच्या वतीने पत्रकारांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार संजय वारकड म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने मतदान यंत्र आणि व्हीव्हीपट बाबत प्रसार प्रसिद्दी आणि जनजागरण करण्यात येत आहे. मा जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली मतदान यंत्र आणि व्हीव्हीपट मशीनची ओळख, हाताळणी मतदान केल्या नंतर सात सेकंदाच्या अवधित आपण कोणाला मतदान केले हे व्हीव्हीपट मशीनच्या स्क्रीनवर पाहून खात्री करता येणार आहे. तसेच याची कागदी स्लीपवर नोंद होणार असून अशा स्लिप सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत जनजागृती करण्यासाठी केज विधानसभा मतदार संघात अशी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.
तसेच केज तालुक्यात ९२ हजार ६५० स्त्री, १ लक्ष २ हजार ४५९ पुरुष असे एकूण १ लक्ष ९५ हजार १०९ मतदार आहेत. आता पर्यंत २१४ मतदान केंद्रावरील ३४ हजार ६०० मतदारांना  याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. तसेच महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, बसस्थानक आणि वर्दळीच्या ठिकानाबरोबरच प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहे. त्याच बरोबर न्यायालयातही मा. न्यायाधीश साहेब आणि वकील मंडळींना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे.
ही जनजागरण मोहीम १९  जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. पत्रकारांनी मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी होत माहिती जाणून घेतली यात व्हीव्हीपॅट मशीन आणि मतदान यंत्रणा याची माहिती व जनजागरण होण्यासाठी मशीचे प्रत्यक्षिक दाखविण्यासाठी मुख्य प्रशिक्षक सोनवळकर यांच्यासह ग्रामसेवक अनिल जगताप यांनी पत्रकार व होमगार्ड यांना प्रात्यक्षिक दाखवून मतदान मोजणी, मतपेटी सील करणे व त्याची सुरक्षितता आदी बाबींची माहिती सांगण्यात आली.
यावेळी तहसिलदार संजय वारकड, नायब तहलीदार सचिन देशपांडे, आशा वाघ,यांच्या सह मंडळ अधिकारी फुलचंद हांगे,गणेश यावेळी उपस्थित होते मशीचे प्रत्यक्षिक पाहण्यासाठी पत्रकार संघाचे विजयराज आरकडे,  सय्यद माजेद, अभय कुलकर्णी, रामदास तपसे, सतीश केजकर, दिपक नाईकवाडे, संतोष गालफाडे, महादेव गायकवाड, गौतम बचुटे, दशरथ चवरे विनोद ढोबळे, इक्बाल शेख, मनोराम पवार दिनकर राऊत यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *