बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आता राजा रामास्वामी यांची नियुक्ती.

देश-विदेश
Spread the love

बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आता राजा रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाली असून त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार उपसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या 22 अधिकाऱ्यांची गुरुवारी (दि.17) पदस्थापनेने बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिलेले राजा रामास्वामी यांची बीडचे नुतन पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. दरम्यान बीडचे मिळते पोलीस अधीक्षकपोद्दार यांच्यासह इतर बदली झालेल्या अधिकाऱ्याला अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वंत्रत्रपणे काढण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यात काम करताना हर्ष पोद्दार यांनी पोलीस दलात विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात विधानसभा,लोकसभा निवडणूकांपासून स्थानिक निवडणुका शांततेत पार पडल्या. बीड जिल्हा पोलीस दलासाठी त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. दरम्यान बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.