सिंधफना नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा.

बीड
Spread the love

माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्यामुळे अतिरिक्त पाणी सिंधफना नदीपात्रात सोडावे लागणार आहे.

सिंधफना नदी पात्रालगतच्या गावांना व या भागांत सावधानतेचा इशारा देऊन सतर्कता म्हणून जाहीर अहवान करण्यात येत आहे की माजलगाव धरण अधिकारी यांच्या कडून प्राप्त माहिती नुसार माजलगाव धरणाचे आज दिनांक 16/9/2020 रोजी रात्री 9 ते 10 वाजे दरम्यान 5 दरवाजे 0.40 मी उचलून सिंधफना नदीपात्रात 8000 क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे, तरी सर्व पूर नियंत्रण यंत्रणेने नोंद घ्यावी,नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये याबाबत सर्व नदी लगतच्या गावांमध्ये संबधीत ग्रामयंत्रणे मार्फत अवगत करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.