लोकांचे रिअल टाईम मॉनिटरींग केले जात आहे. या लोकांशी संबंधित प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवले जात आहे.

देश-विदेश
Spread the love

मुंबई – एकीकडे पूर्व लडाखमध्ये तणावाचे वातावरण असताना चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी (Chinese Communist Party) कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील 24 लाख लोकांवर नजर ठेवत असल्याचे समोर आले आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद(President Ram Nath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi), विरोधी पक्षनेते सोनिया गांधी (Sonia Gandhi and their families), विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका ते उद्योगपतींचाही समावेश आहे. मात्र आता याचा थेट तुम्हालाही फटका बसू शकतो.

हायब्रीड वॉरफेअर (Hybrid Warfare) आणि चीनच्या विस्तारासाठी डेटा वापरण्यात ही कंपनी सर्वोत्कृष्ट मानली जाते. झेन्हुआच्या डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडकडून या लोकांचे रिअल टाईम मॉनिटरींग केले जात आहे. या लोकांशी संबंधित प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवले जात आहे. ही कंपनी केवळ बड्या लोकांवरच नाही तर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमाटो आणि स्विगी या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांवरही चीन लक्ष ठेवून आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, उबर इंडियाचे ड्रायव्हर ऑपरेशन्सचे प्रमुख पवन वैश, जोमाटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल आणि स्विगीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन रेड्डी यांच्यावरही चीन नजर ठेवून आले.