आता..सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

देश-विदेश
Spread the love

सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरताही येतो.

आता आपण डिजिटल सही असलेला सातबारा कसा काढायचा आणि तो वाचायचा कसा, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

डिजिटल सातबारा कसा काढायचा?
सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर

http://bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.

यावर तुम्ही क्लिक केल्यास ‘आपला 7/12’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.