जालना शहरात कोरोनाचा कहर; तब्बल 80 रूग्णांची भर

आरोग्य
Spread the love

संभाजीनगरमध्ये 36 रुग्ण आढळल्याने खळबळ
मराठवाडा साथी न्यूज
जालना ।
शहरात गुरुवारी सकाळी तब्बल 80 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील तब्बल 36 रुग्ण हे एकट्या संभाजीनगर भागातील असल्याने खळबळ उडाली आहे. प्रयोग शाळेकडून सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार संभाजीनगरमध्ये 36 कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ मस्तगड 5, लक्कडकोट 6, रुख्मिनी नगर 4, पोलास गल्ली, पुष्पक नगर प्रत्येकी 3, हिरखान रोड, पाणीवेस आणि नेहरू रोड प्रत्येकी 2 तसेच अंबर हॉटेल जवळ, कालिकुर्ती, गोकुलविहार, लक्ष्मीनगर, बुऱ्हाणनगर, निलमनगर, सत्यनारायण नगर चंदन झिरा, सिद्धिविनायक नगर, शंकर नगर, संजयनगर, मोदीखाना, मित्तल नगर, दुःखी नगर, तट्टूपुरा, आनंदी स्वामी गल्ली, नाला जालना आणि खडकपुरा या भागातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली.