औरंगाबाद : दुसऱ्या टप्प्यात शहरात 25 तर ग्रामीण भागात 63 रुग्णांची वाढ, चौघांचा मृत्यू

आरोग्य
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद ।
जिल्ह्यात आज मंगळवारी दुपारी 90 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले, त्यामुळे एकूण बाधितांची 8972 संख्या झाली आहे. त्यापैकी 5229 बरे झाले, 362 जणांचा मृत्यू झाला. तर 3381 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 02 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. लॉकडाऊननंतर शहरातील स्थिती दिलासादायक दिसून येत आहे. आज शहरात सकाळी 17 तर दुपारी 25 असे एकूण 42 रुग्ण आढळून आले जे की, रोजच्या तुलनेत खूपच कमी आहेत. तर ग्रामीण भागात कोरोनाचा गतीने प्रसार होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात सकाळच्या टप्प्यात 51 तर दुपारच्या टप्प्यात 63 असे 114 कोरोनाबाधित आढळले आहेत.

दुपारच्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (25)
एन दोन, हडको (1), एन चार सिडको (4), गांधी नगर (1), कॅनॉट प्लेस (1), ज्योती नगर (1), माऊली तरंग (1), भारत नगर (2), जाफर गेट (1), क्रांती नगर (1), सेना नगर, बीड बायपास (1), शाहिस्ता कॉलनी (1), नवनाथ नगर (1), विवेकानंद नगर (2), सिल्क मिल कॉलनी (1), नगारखाना, गुलमंडी (1), घाटी परिसर (1), अन्य (4)

ग्रामीण रुग्ण : (63)
रांजणगाव (7), छत्रपती नगर, रांजणगाव (1) श्रीगणेश वसाहत, वाळूज (1), स्वामी केशवानंद नगर, रांजणगाव (3), दत्त नगर, रांजणगाव (1), विटावा, गंगापूर (6), अजिंक्यतारा सो., जिकठाण (1), साठे नगर, वाळूज (1), जुने रांजणगाव (1), रांजणगाव शेणुपजी (2), विजय नगर, वाळूज (2), संघर्ष नगर, घाणेगाव (1), म्हस्की चौफुली, वैजापूर (1), कुंभारगल्ली, वैजापूर (3), बजाज नगर (2), अजिंठा, सिल्लोड (1), पळशी (1), साऊथ सिटी (1), समर्थ नगर, कन्नड (2), विराज सो., बजाज नगर (1), मनोमय रेसिडन्सी, सिडको महानगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), जय भवानी नगर, बजाज नगर (1), सिडको महानगर दोन (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), निलकमल सो., बजाज नगर (1), तिसगाव (7), पारिजात नगर, बजाज नगर (1) द्वारकानगरी, बजाज नगर (3), श्रमसाफल्य सो., बजाज नगर (5), मयूर नगर, बजाज नगर, वडगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत पद्मपुऱ्यातील 42 वर्षीय पुरूष, आंबेडकर नगरातील 49 वर्षीय स्त्री, औरंगपुऱ्यातील 65 वर्षीय पुरूष, राम नगरातील 65 वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.