स्टील कारखान्यात स्फोट, दोन कामगारांच्या शरीराचे झाले तुकडे

ब्रेकिंग
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज नेटवर्क
खोपोली । येथील इंडिया स्टील कारखान्यात मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कच्चे लोखंड भट्टीत वितळवून टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने मृत्यू पावलेल्या कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले आहेत. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरून गेला. दिनेश वामनराव चव्हाण (वय ५५) व प्रमोद दूधनाथ शर्मा (३०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर सुभाष धोंडीबा वांजळे (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. वांजळे यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस व अन्य यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून पुढील चौकशी सुरू आहे.