बीड जिल्ह्यात आढळले ९ बाधित; परळी शहराचा लॉकडाउन २ दिवसांसाठी वाढवला

आरोग्य
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज
बीड । जिल्ह्यातून दि.११ आणि १२ जुलै दरम्यान एक हजाराच्या पुढे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी दि. ११ रोजी ९ पॉझिटिव्ह निघाले, १२ रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान ५ पॉझिटिव्ह आढळले आता पुन्हा दि. १३ रोजी  ११:४० वाजण्याच्या दरम्यान १९५ स्वॅबचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये ९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर अनिर्णीत – २ , निगेटिव्ह – १८४ आणि कालचे आणि आजचे प्रलंबित ४३४ स्वॅबचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

दरम्यान परळी शहराचा लॉक डाउन आणखी २ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे, कारण सर्व स्वॅबचे रिपोर्ट आणखी प्राप्त झाले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
काल रविवारी रात्रीच्या बाधितांमध्ये बीड येथून पाठविण्यात आलेल्या स्वॅब पैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये १६ वर्षीय पुरुष (रा.चौसाळा, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), ३५ वर्षीय पुरुष (रा.चौसाळा, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), ३७ वर्षीय महिला (रा.चौसाळा, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), ४० वर्षीय पुरुष (रा.रानुमाता मंदीराच्या मागे , शाहुनगर , बीड), ५२ वर्षीय महिला (रा.तुळजाईनगर, बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), ३७ वर्षीय महिला (रा.संत तुकारामनगर, बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत), ४६ वर्षीय पुरुष (अक्षय प्लाझा, व्यंकटेश शाळेच्या जवळ, भक्ती कंस्ट्रक्शन, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) शिरुर मधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. ४५ वर्षीय पुरुष (रा.तागडगाव, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) तर आष्टी मधील ४२ वर्षीय पुरुष (रा.दत्तमंदीर गल्ली, आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) यांचा समावेश आहे. मागील दोन दिवसातील ४३३ स्वॅबचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.