श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रशासनात त्रावणकोर राजपरिवाराचे अधिकार कायम – सुप्रिम कोर्ट

देश-विदेश
Spread the love

कोच्ची । केरळच्या प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय बदलत देशातील प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

श्री पद्मनाभ स्वामी मंदिर काही वर्षांपूर्वी संपत्तीमुळे चर्चेत आले होते. श्री पद्मनाभ स्वामी मंदिर देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मंदिराजवळ दोन लाख कोटीची संपत्ती असल्याचे बोलले जाते. १८ व्या शतकात त्रावणकोरच्या शाही कुटुंबाने श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे पूननिर्माण केले होते. केरळ उच्च न्यायालयाने २०११ साली श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या संपत्तीवर राज्य सरकारचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला त्रावणकोरच्या शाही परिवाराने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात या खटल्यावर आठ वर्ष सुनावणी चालली. एप्रिल महिन्यात न्यायाधीश ललित आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने निकाल सुरक्षित ठेवला होता.