औरंगाबाद : दुसऱ्या टप्प्यात 73 रुग्णांची वाढ

आरोग्य
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद ।
जिल्ह्यातील 73 रुग्णांचे अहवाल आज (सोमवारी) सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आता एकूण कोरोनाबधितांची संख्या 8650 एवढी झाली आहे. त्यापैकी 5061 बरे झाले असून 354 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3235 जणांवर उपचार सुरु आहेत.

सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण : (66) – सातारा परिसर (9), मिल कॉर्नर (1), वेदांत नगर (2), काका चौक, पद्मपुरा (1), नक्षत्रवाडी (2), छावणी (4), पद्मपुरा (1), कुँवरफल्ली (1), इटखेडा (3), पडेगाव (1), अशोक नगर, मसनतपूर (8), शिवशंकर कॉलनी (3), सौजन्य नगर (1), सारा वैभव, जटवाडा रोड (1), एन सहा, सिडको (1), एन नऊ,श्रीकृष्ण नगर (1) जय भवानी नगर (1), मुकुंदवाडी (1), विठ्ठल नगर (1), नागेश्वरवाडी (1), उस्मानपुरा (1), केसरसिंगपुरा (10), साई बाबा मंदिर परिसर, पद्मपुरा (2), एन बारा (3), घाटी परिसर (2), चिकलठाणा (1), चिंचबन कॉलनी (2), मीरा नगर, पडेगाव (1)

ग्रामीण रुग्ण : (07) – आयोध्या नगर, बजाज नगर (1), बजाज नगर (1), गेवराई, दौलताबाद (1),कुंभार गल्ली, वैजापूर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.