छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार; MSME साठी 20,000 कोटी

अर्थसत्ता देश-विदेश
Spread the love

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत फुटपाथवरचे दुकानदार अन्
विक्रेत्यांसाठी मोठी कर्ज योजना मोदी सरकारने जाहीर केली आहे. नागरी गृहनिर्माण मंत्रालयानं विशेष सूक्ष्म-कर्ज योजना सुरू केली असून, याद्वारे छोटी दुकाने किंवा पथ विक्रेते कर्ज घेऊ शकणार आहेत. ही योजना बराच काळ टिकेल. याचा फायदा 50 लाखांहून अधिक दुकानदारांना होणार आहे.
आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत संकटात अडकलेल्या MSME ला इक्विटी मदत देण्याची घोषणा झाली. त्यानुसार २० हजार
कोटी रुपयांच्या सहाय्यता निधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. याचा फायदा संकटात अडकलेल्या २ लाख MSME ला होऊ शकतो. ५० हजार कोटी रुपयांच्या इक्विटी गुंतवणुकीचा प्रस्तावही पहिल्यांदाच मांडण्यात आला.
यामुळे एमएसमएमई उद्योगांना शेअर बाजारात शिरण्याची संधी मिळेल. एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे केंद्रीय मंत्रीप्रकाश जावडेकर म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय हातावर पोट  असणाऱ्या अनेकांसाठी तसंच शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचे आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पुरेसा फंड उपलब्ध करून
देण्यात आला आहे. त्यांना कर्ज पुरवठ्यासाठी अनेक योजना तयार करण्यात आल्या आहेत.
यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगही शेअर बाजारात दाखल होऊ शकतील, असे जावडेकर णाले. यानंतर, MSME मध्ये अनेक नोकऱ्या तयार होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या व्याख्येतही आता बदल करण्यात आलाय. यानुसार, सूक्ष्म
उद्योगांत गुंतवणुकीची सीमा वाढवून १ कोटींची गुंतवणूक आणि ५ कोटींचा व्यवसाय असणाऱ्या उद्योगांची गणना MSME मध्ये होणार आहे.

Tagged