शाळा बंदच, पण जूनपासून शैक्षणिक वर्ष होणार सुरु

करिअर मंत्र मुंबई
Spread the love

मुंबई : साथीऑनलाईन

दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावे, असा महत्वाचा निर्णयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शिक्षण विभागाच्या महत्वाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जूनपासून शाळा सुरु होणार नसल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

Tagged