250 खाटांचे कोविड रुग्णालय 10 जूनपासून औरंगाबादकरांच्या सेवेत – पालकमंत्री देसाई

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंाबाद : साथी ऑनलाईन

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यात यंत्रणेला मिळत असलेले यश, ही समाधानाची बाब आहे. शहरातील कोरोना संसर्गही आटोक्यात आणून औरंगाबादला ग्रीन
झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी
शनिवारी येथे केले. टास्क फोर्सच्यासूचनांप्रमाणे उपचार पद्धती अधिक परिणामकारक करण्याचे निर्देशही नी दिले. मनपाने वॉर्डनिहाय गरजेनुसारतापतपासणीशिबिरांचेआयोजनकरावेत, येत्या दहा जूनपासूनकोविड रुग्णालय कार्यान्वित होणार असून तिथे 250 खाटांची व्यवस्थासुविधा करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. विद्यापीठातील कोविड केंद्रालाही भेट
दिली. जिल्ह्यात कोरोना संसर्गरोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी अधिका
ऱ्यांना सूचना दिल्या. लोकांची मानसिकता मजबूत
करणे महत्वाचे असून मनपाने वॉर्ड निहाय ताप तपासणी शिबिरांचे आयोजन करावे. खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी. ऑक्सीजन, रक्ताचा व्यापक साठा उपलब्ध ठेवावा, आदी
सूचना त्यांनी दिल्या.शनकार्ड नसलेल्यांना शासनाने मे, जून महिन्यासाठी प्रति व्यक्तीपाच किलो तांदूळ मोफत देण्याचा
निर्यण घेतला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. टोळधाडीचे संकट निर्माण झाले आहे. पार्श्वभूमीवरजिल्ह्यात प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही ते म्हणाले.
कोविड संशोधन केंद्र उपयुक्त कोविड-19 या विषाणुच्या
संशोधन कार्यात ‘कोविड-19 संशोधनकेंद्र’ नक्कीच मोलाचे ठरेल, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील कोविड-19 संशोधन केंद्राला त्यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी केली.
माजी खासदार चंद्रकांत खैरे, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिक कुमार
पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डीएनए बारकोडींगचे संचालक डॉ.जी.एस.खेडकर आदी उपस्थित
होते.
एमआयडीसीतील ऑरीक सिटीमार्फत सीएसआर फंडातून
एक कोटी 23 लाख रुपयांचा निधी संचालक मंडळाने मंजूर करुन कोविड संशोधन केंद्र तातडीने उभे केल्याबद्दल
समाधान व्यक्त केले. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी संशोधन केंद्राच्याउभारणीची माहिती दिली. या केंद्रात सध्या 23 कर्मचारी आहीत. दररोज एक हजार स्वॅब तपासणीचे उद्दिष्ट
आहे. डीएनए बारकोडींगचे संचालक डॉ.जी.एस.खेडकर यांनी संगणकीय सादरीकरण करून संशोधनाची माहिती
दिली.
कुलगुरू डॉ.येवले यांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे आपत्तीव्यवस्थापन विभागाकडून 35 लाख रुपये व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्यावेतन कपातीतील एकूण रक्कम 9 लाख 26 हजार 100 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

Tagged