परळी तालुक्यातील हाळंब येथील दोघांना कोरोनाची लागण!

ई पेपर बीड
Spread the love

परळी : बीड जिल्ह्यातील आणखी सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथील २, पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील १, वाहली येथील १ तर परळी तालुक्यातील हाळंब येथील दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत ५५ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आलेले आहेत. आज मंगळवारी ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. त्यापैकी ०६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे तर २२ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. दोन अहवाल अद्यापही प्रलंबीत ठेवण्यात आले आहेत.