ब्रेकिंग ! औरंगाबाद 17 तारखेपर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन – विभागीय आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद औरंगाबाद ब्रेकिंग
Spread the love

अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता सर्व राहणार बंद

विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार गुन्हा दाखल ; सर्व पोलीस फोर्स उतरणार रस्त्यावर – पोलीस आयुक्तांचेही कडक आदेश

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे
शहरात कोरणा विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संचारबंदी /जमावबंदी आदेश पूर्वीपासूनच लागू करण्यात आलेली आहे. शहरांमध्ये सम आणि विषम तारखा निश्चित करण्यात आलेले आहे. तरीही अनेक जण घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी आता औरंगाबाद प्रशासन लॉकडाऊन बाबत अधिक कडक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज रात्री 12 वाजेपासून ते 17 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता शहरातील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. तसेच याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

दुसरीकडे पोलीस प्रशासनही कडक भूमिका घेणार असून आज शुक्रवार विषम तारीख आहे. त्यामुळे आज अत्यावश्यक सोडून सर्व बंद आहे. नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा भाजीपाला इतर वस्तूंच्या खरेदीसाठी कोणीही रस्त्यावर येणार नाही जर का कोणी रस्त्यावर विनाकारण फिरत असतील तर त्याची गाडी जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत. जर का कुणी असा माणूस रस्त्यावर आला तर त्याची गाडी जप्त केली जाईल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सक्त आदेश दिले आल्याची माहिती सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.


आज १५ मे विषम तारीख आहे. किराणा दुकान उघडणार नाही. कोणताही बहाणा करून रस्त्यावर येऊ नये जर कोणी रस्त्यावर आले तर त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. विशेषतः दुचाकी, चारचाकी वाहनवर सक्तीने कारवाई होईल. सर्वांनी घरी राहावे. विना पास कोणीही रस्त्यावर दिसता कामा नये.
– चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त


सर्व अधिकारी-कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, दि.17 मे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात येत आहे. सर्व पासेस रद्द करण्यात आलेले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा व आस्थापना शासकीय कर्मचारी कर्तव्यावर जातील. इतर कोणीही घराबाहेर पडणार नाही.
– अस्तिककुमार पांडेय, प्रशासक, महापालिका