कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा २९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून

खेळ जगत देश-विदेश
Spread the love

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हयरसमुळे एकच खळबळ उडाली आहे. चीननंतर आता जगातील अनेक देशामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. भारतातही कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे याचा फटका भारतातील इंडियन प्रिमीयर लीग (IPL) लाही बसलेला आहे. जगभरातील अनेक महत्वाचे खेळ थांबवण्यात आले आहेत. तर काही खेळाचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येत आहेत. त्यामुळे जगातील अनेक लीगना या कोरोनाचा फटका बसला आहे. भारतातील पर्वत लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही होणार की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सरकारने भारतातील अनेक शहरात हे सामने खेळवले जाऊ शकणार नाहीत असे घोषित केले होते. (IPL)  सामने २९ मार्चपासून सुरु होणार होते. या लीग मध्ये जे बाहेरदेशातील खेळाडू सहभागी होणार होते, त्यांनाही १५ एप्रिल पर्यंत भारतात येण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर बीसीसीआय ने आज झालेलया बैठकीत हे सामने २९ मार्चऐवजी आता १५ एप्रिल पासून खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

Tagged