भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द

खेळ जगत
Spread the love

धर्मशाळा : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला वनडे सामना आज पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तीन वनडे सामन्याच्या मालिकेत आज धर्मशाळा येथे पहिला सामना दुपारी १:३० वाजता सुरु होणार होता. पण पावसाने मात्र निराशा केली. कालही (बुधवारी) धर्मशाळा येथे पाऊस झाला होता. त्यामुळे आज (गुरुवारी ) देखील पावसाची शक्यता होती. त्याप्रमाणे आजही पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे आजचा सामना रद्द करण्याचाच निर्णय घेण्यात आला आहे. पाऊस थांबला तयार २० ओव्हर चा सामना खेळवला जाणार होता परंतु पाऊस जोरदार असल्यामुळे अखेर सामना रद्द करावा लागला आहे.

Tagged