भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रंगणार पहिला वनडे सामना 

खेळ जगत देश-विदेश
Spread the love

धर्मशाळा :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे रंगणार आहे. भारताने न्यूझलंड कडून वनडे आणि टेस्ट मालिकेत व्हाईट वॉश ची नामुष्की ओढवली होती. भारताला वनडे आणि टेस्ट मालिकेत खूप मोठा प्रभाव स्वीकारावा लागला होता. आज दक्षीण आफ्रिका यांच्याविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात भारत विजयाने सुरवात करण्यास उत्सुक असेल. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, आणि हार्दिक पंड्या यांचं संघात पुनरागम झालं आहे. त्यामुळे भारताची बाजू मजबूत झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विश्राती देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्याला पुन्हा या मोलिकेत खेळण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. दक्षीण आफ्रिका संघात माजी कर्णधार फॅफ डुप्लेसी याच पुनरागम झालं आहे. त्याचबरोबर आफ्रिका संघाची दारोमदार कर्णधार डिकॉक आणि डुप्लेसी यांच्यावर अवलंबून असेल.

Tagged