गुलाब आणि प्रेम

लाईफ स्टाईल
Spread the love

आज पासून व्हॅलेंटाइन वीकला सुरूवात झाली आहे. या आठवड्यात आपण कोणाबद्दल तरी असलेलं आपलं प्रेम व्यक्त करू शकतो ते पण बिनधास्त. आज रोज डे आहे. या दिवशी तुम्ही गुलाब देऊन आपल प्रेम व्यक्त करू शकता. प्रेमामध्ये म्हणून गुलाबाला खूप महत्व आहे. आपण वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांचा रंग बघितला असेल. त्या रंगाचा नेमका काय अर्थ आहे. ते जाणून घेऊ यात.

लाल गुलाब
प्रत्‍येकास आपल्‍या आवडत्‍या व्‍यक्‍तीला म्‍हणजे जोडीदाराला लाल गुलाब देण्‍यास आवडते. कारण लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तुझ्‍यावर माझे प्रेम आहे.. हीच भावना यापाठीमागे लपलेली असते. लाल रंग हा प्रेमाचा खरा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात. त्‍यामुळे प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी लाल गुलाब सर्वात उत्तम पर्याय मानला जातो.

पिवळा गुलाब
पिवळा रंग दोस्‍तीचे प्रीतक मानले जाते. पिवळा रंग समजुदरापणा, आनंद, आपलेपणा, खरेपणा दर्शवतो. पिवळ्या रंगाचा गुलाब देण्‍यामागे तू माझा जीवलग मित्र किंवा मैत्रीण होतास आणि कायमस्वरूपी राहशील हीच भावना असते. एकाद्‍यासोबत आपणा मैत्री करायची असेल तर पिवळा गुलाब देऊन मैत्रीची सुरुवात करता येते.

गुलाबी गुलाब
गुलाबी रंग हा प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखादी व्यक्ती आणि त्याचा स्वभाव आवडत असेल, त्‍याच्‍याविषयी आपलेपणाची भावना दर्शवण्‍यासाठी गुलाबी रंगाचा गुलाब भेट देऊ शकता. तू मला आवडतोस किंवा आनंदी, उत्‍साही असण्‍याचा संकेत गुलाबी गुलाब देतो.

केशरी गुलाब
केशरी गुलाब कृतज्ञता, उत्‍साह, इच्‍छा दर्शवतो. आपल्‍या जोडीदारास आपले आयुष्‍य उत्‍साहपूर्ण बनवल्‍याप्रती त्‍यास केशरी गुलाब देऊन आपल्‍या मनातील भावना व्‍यक्‍त करु शकता.

पांढरा गुलाब
पांढरा गुलाब पवित्रता, शांतता आणि एकतेचे प्रतिक मानला जातो. शाश्वत, शुद्ध आणि निखळ प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी पांढरा गुलाब दिला जातो. आपले नाते असेच वर्षोनवर्षे टिकून राहावे यासाठी आपल्‍या जोडीदारास पांढरा गुलाब भेट म्‍हणून देऊ शकता. नात्‍यामधील विश्‍वास दर्शवण्‍याचे काम पांढरा गुलाब करतो. यासाठी लग्‍नामध्‍येही पांढर्‍या गुलाबांचा वापर केला जातो.

 

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *