औरंगाबादच्या उद्योजकांनी सर केले कळसुबाई शिखर

औरंगाबाद लाईफ स्टाईल
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

कामाच्या  व्यापामुळे स्वतःसाठी वेळ देणे सर्वांनाच कठीण बनले आहे. त्यात स्वतःच्या आरोग्याकडेही नीट लक्ष देता येत नाही. मात्र, कितीही व्याप असु द्या दृढ निश्चय केला तर सर्व काही शक्य आहे. याची प्रचिती आणून दिली ते वाळूज एमआयडीसी
येथील पन्नाशी गाठलेल्या सात तरुण उद्योजकांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यशस्वीपणे सर करून दाखविले आहे. वय कोणतेही असो नेहमी फिट राहिले पाहिजे असा संदेश या उद्योजकांनी या मोहिमेतून दिला आहे.

या सर्वांनी मोहीमेस मिळालेल्या यशामुळे आगामी एप्रील मध्ये एवरेष्ट बेस कॅंप सर करण्याचा संकल्प केला आहे.

या मोहिमेत उद्योजक राजेश मानधनी, रविंद्र कोंडेकर, दिगंबर मुळे, अंकुश लामतुरे, गोवर्धन बजाज, शिरीष लोया, कैलाश मालपाणी यांनी एव्हरेस्ट वीर रफीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरील मोहीम पार पाडली. रविवार दि.19 जानेवारी रोजी सकाळी प्रत्यक्ष चढाईत सुरुवात करण्यात आली. खडतर रस्ता, कडाक्याची थंडी अशा परिस्थितीत चार उंच लोखंडी शिड्या पार करत सर्व उद्योजकांनी धैर्याने कळस गाठला. विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी असलेले उद्योजक हे पर्यावरण,
वृक्षलागवड, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर यासह सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. औद्योगिक जीवन हे कायम ताण तणावाचे असते. त्यामुळे उद्योजकांना किप फिट हा संदेश देण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते असे मोहिमेत सहभागी उद्योजकांनी सांगितले. या मोहिमेबद्दल जायंट्स ग्रुप ऑफ वाळूज व मसीआ यांच्या वतीने मोहिमेतील सर उद्योजकांचे अभिनंदन केले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *