वेदिका साळुंकेची राज्यस्तरीय स्पर्धेची निवड

  बीड (प्रतिनिधी)ः- येथील द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयातील इयत्ता 7 वीची विद्यार्थीनी वेदिका नेमीराज साळुंके या विद्यार्थीनीची औरंगाबाद येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विभागीय पोहण्याच्या स्पर्धेत विभागात दुसरी आल्याने नागपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून या निवडीने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वेदिका साळुंके हिने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळवून विभाग स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी […]

अधिक वाचा

दिंद्रुडचे शेकडो तरुण तुळजापूर कडे रवाना● ओमप्रकाश शेटेंच्या उमेदवारीसाठी तुळजाभवानीला साकडे..!

दिंद्रुड दि.29 (प्रतिनिधी) :- आज दिंद्रुड येथील शेकडो तरुण तुळजापूरहुन पायी मशालज्योत आणण्यासाठी वाजत गाजत रवाना झाले. गावच्या भूमीपुत्राला भाजपा कडून उमेदवारी मिळावी व प्रचंड मताधिक्यांनी त्यांचा विजय व्हावा यासाठी गावकऱ्यांच्या वतीने तुळजाभवानीला साकडे घालण्यात येणार आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, माजलगाव मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू तथा मुख्यमंत्री सहायता कक्षाचे […]

अधिक वाचा

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गोरख चव्हाण यांचा सत्कार

औरंगाबाद /प्रतिनिधी पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक गोरख चव्हाण यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीमुळे २०१९ मध्ये पोलीस दलातील सन्मानाचा पुरस्कार राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. गोरख चव्हाण हे सन १९८६ मध्ये विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यांचे वर्गमित्रांनी, आपल्या मित्रास राष्ट्रपती परस्कार मिळाला याचा अभिमान बाळगुन व या निमित्ताने पुन्हा ३४ […]

अधिक वाचा

मिताली कुलकर्णी सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यश

औरंगाबाद : येथील मिताली अमित कुलकर्णी हिने बंगळुरू येथे झालेल्या सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यश मिळवले.  महाराष्ट्र संघातर्फे १७ वर्षांखालील मुलींमध्ये तिने सहभाग नोंदविला. पादुकोण द्रविड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंगळुरू येथे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान झालेल्या सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. मिताली हिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिताली […]

अधिक वाचा

रोटरी भूषण पुरस्कारा पाठोपाठ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सुरेश शिनगारे सन्मानीत

किल्लेधारुर / प्रतिनिधी श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथील माध्यमिक शिक्षक तथा किल्ल्लेधारुर येथील किल्लेधारुर युथ क्लबचे सक्रिय सदस्य सुरेश भैरुनाथ शिनगारे यांना विभागीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार, समाज कार्यासाठी रोटरी क्लबचा रोटरी भूषण या पुरस्कारा पाठोपाठ आता अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ संस्था सोलापूर व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार […]

अधिक वाचा

कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाचा मुलींनी लाभ घ्यावा- सौ.शिल्पा ओमप्रकाश शेटे

माजलगांव-सिद्धेश्वर विद्यालयात कॅन्सर लसीकरण जागृती पालक मेळावा आज संपन्न झाला.मुली – महिला कॅन्सर लसीकरणची जागृती निर्माण करण्यासाठी येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात आज कॅन्सर लसीकरण जागृती पालक मेळावा संपन्न झाला. दि.२८ रोजी तब्बल ५०० मुलींना २५ लाख रूपयांच्या कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.मेळाव्याची सुरुवात माता सरस्वती, महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. या पालक मेळाव्याचे […]

अधिक वाचा

विधानसभेचे बिगुल वाजले: महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला निकाल

नवी दिल्ली : ( मराठवाडा साथी ऑनलाइन) महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा आज मुख्य निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाराष्ट्र आणि हरियाणात आज दुपारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला एकाच टप्यात मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा […]

अधिक वाचा

सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात शिक्षण, आरोग्य आणि संस्काराची रुजवण केली जाते – ओमप्रकाश शेटे

माजलगाव ( प्रतिनिधी ) श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात शुद्धजल पुरवठा प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन, सामान्य,गोरगरीब, कुटुंबातील मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची रुजवण करणारे हे श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल आहे.त्याचाच एक भाग म्हणून शुद्ध जलप्रकल्प आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा उत्तमराव कांदे(मा जिल्हासंघचालक- बीड जिल्हा (पुर्व), प्रमुख […]

अधिक वाचा

धारूर तालुका माहेश्वरी सभेच्या सचिवपदी पञकार बालाप्रसाद जाजु यांची निवड

तेलगाव, दि (प्रतिनिधी)= धारूर तालुका माहेश्वरी सभेची नुतन कार्यकरणी शनिवारी सर्वानुमते निवडण्यात आली असुन, यावेळी माहेश्वरी तालुका सभेचे अध्यक्ष म्हणुन धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुलेख कलंत्री यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणुन जगदीश तोष्णीवाल तर तालुका सचिव म्हणुन पञकार बालाप्रसाद जाजु यांची निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी […]

अधिक वाचा

पक्षाने आदेश दिल्यास शिवसेनेच्या वतीने माजलगाव विधानसभा लढवणार- आप्पासाहेब जाधव

  माजलगाव ( प्रतिनिधी ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आदेश दिला तर माजलगाव विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आपण तयार असल्याचे आप्पासाहेब जाधव यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांतजी खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या विधानसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा